Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण येथे रविवारी दिनांक ११ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन IPL स्पर्धा स्थगित : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाची घोषणा उद्या देशभरात सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल : महाराष्ट्रात याठिकाणी होणार मॉक ड्रिल? उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांच्या माध्यमातून संधीचे सोने करावे - धीरज अभंग तरडगाव येथे यात्रेत दोन गटात राडा : २२ जणांना अटक लाडक्या बहिणींसाठी मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवला वेव्हज 2025 : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनिानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले ध्वजवंदन - सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार - पालकमंत्री शंभूराज देसाई शिंपी समाज महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी श्रीमती सुलभा मोहटकर तर सचिवपदी सौ. रेखा हेंद्रे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया थाटामाटात साजरी होणार : विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा ता. खंडाळा यांच्या वतीने श्रामनेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस : बिरदेव डोणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल तालुक्याचा विकासाचा बॅकलॉक भरून काढणार - मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर शहराचा पारा ४२ पार ? प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ ; प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही सूचना नाहीत फलटण तालुका भाजपा मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर : अमित रणवरे, लक्ष्मणराव सोनवलकर, विकास उर्फ बापूराव शिंदे यांना संधी डॉ. आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाला विलंब का ? आंबेडकरी अनुयायांचा प्रश्न डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया फलटण शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी वाचनालयास पुस्तके भेट पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी - उपमुख्यमंत्री अजित पवार समोसे, जिलेबी, कचोरीला इंग्रजीत काय म्हणतात? खूप कमी लोकांना ठाऊक आहे इंग्रजी शब्द... चला तर मग गॅलेक्सीच्या चेअरमनपदी सचिन यादव तर व्हॉइस चेअरमनपदी योगेश यादव ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांचा उद्या साताऱ्यात गौरव समारंभ फलटण तालुक्यातील थेट सरपंच निवडी आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव हातचालखीने ए.टी.एम.कार्डचा वापर करुन पावणे दोन लाखाला गंडा फलटण शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे प्रकार विविध समाजाने एकमेकांकडे पाहताना दृष्टिकोन बदलावा - सचिन मोरे कु. अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहिर तंत्रज्ञानाच्या युगात सावधान... MS-CIT शिकायचं आहे ! अधिकृत सेंटरलाच प्रवेश घ्या भीमज्योत घेऊन महिला धावणार - निंभोरे ते मुंजवडी भीमज्योतीचे आयोजन पिंपरद (ता. फलटण )येथे उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन पदर आईचा अन् आयुष्याचा.... युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद : वापरकर्त्यांकडून प्रचंड तक्रारी महात्मा फुले यांना जन्मदिनानिमित्त तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडून अभिवादन फलटण येथे महात्मा फुले यांची जयंती उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉ. आंबेडकर जयंतीमंडळाच्या वतीने अभिवादन सांधे - दुखी आणि त्यावरील आधुनिक उपचार : प्रसिद्ध अस्थिरोग शल्य चिकित्सक डॉ प्रसाद जोशी DD संह्याद्रीवर थोर समाज सुधारक - महात्मा जोतिबा फुले फलटण येथे भगवान महावीर जयंती उत्साहात संपन्न - आमदार सचिन पाटील यांनी केले अभिवादन बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - आमदार सचिन पाटील टंचाई भागातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी -पालकमंत्री शंभूराज देसाई भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजन फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.नितीन जाधव तर सचिवपदी ॲड. निलेश भोसले मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक सहाय्यासाठी 7 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणेबाबत आवाहन डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पिक नोंदणी करण्याचे आवाहन सहयाद्री सहकारी साखर कारखानाच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 मधील तरतुदी लागू सातारा जिल्ह्याच्या उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील - उद्योग मंत्री उदय सामंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय साताराचे लोकार्पण पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक

रामराजेंना फलटणमध्ये धक्का - महायु्तीचे सचिन पाटील विजयी

टीम : धैर्य टाईम्स

गेली तीस वर्षाच्या राजकीय साम्राज्याला अखेर धक्का बसला. फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे महायु्तीचे उमेदवार सचिन पाटील यांनी विजय मिळवीला असून रामराजेंना फलटणमध्ये मोठा धक्का बसला आहे. सलग 30 वर्ष विधानसभा निवडणूकीत सलग विजयी मिळवणारे राजेगटाला फलटणच्या मतदारांनी नाकारले असून भाजपाचे मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वर विश्वास दाखवीत सचिन पाटील यांना 17046 मतांनी विजयी करीत फलटणला नवा आमदार दिला. 


 अत्यंत चुरशीच्या झालेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक चव्हाण यांचा  17046 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. फलटण तालुक्यात 30 वर्षांनी राजे गटाच्या हातून विधानसभेची सत्ता गेली आहे. माजी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा नेतृत्वाखाली खासदार गटाने परिवर्तन घडवित लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला आहे. सलग चार वेळा आमदार निवडून देण्याचा योग यावेळी सुद्धा फलटणकरांनी येऊ दिलेला नाही.


फलटण - कोरेगाव (अ. जा.) विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व दोन्ही नाईक निंबाळकर घराण्याची प्रतिष्ठेची झालेली होती. गेली तीस वर्ष फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता होती मात्र या विधानसभा निवडणुकीत या सत्तेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी छेद देत त्यांचे कट्टर समर्थक सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणलेले आहे. 


आज सकाळी येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांनी घेतलेली आघाडी आमदार दीपक चव्हाण यांना रोखता आली नाही ही आघाडी हळूहळू सचिन पाटील यांनी वाढवत नेली. जस जसी आघाडी वाढू लागली तसतसे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला कार्यकर्त्यांनी फलटण शहरात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलालांची उधळण करीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

    

या निवडणुकीमध्ये निरा देवघर, पाणी प्रश्न,कमिन्स कंपनीमधील कामगारांचा पगाराचा मुद्दा, श्रीराम साखर कारखाना, सहकारी दूध पुरवठा संघ, सहकारी खरेदी विक्री संघ, साखरवाडी साखर कारखाना, फलटणची बारामतीशी केलेली तुलना,रस्ते ,आरोग्य हे प्रश्न माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारात मांडून जनतेचा कौल मागितला होता. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा पण मांडला होता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा प्रभावी प्रचार खासदार गटाने केला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आरोपांना राजेगटाकडून प्रभावी उत्तर देणे जमले नाही.सारासार सर्व गोष्टींचा विचार करून जनतेने आपला कौल दिला. फलटण तालुक्याच्या इतिहासात आत्तापर्यंत तीन वेळा आमदार केल्यानंतर चौथ्यांदा आमदार करण्याची संधी फलटणकरांनी कोणालाही दिलेली नाही. चौथ्यांदा आमदारकी निवडणुकीत उतरलेले दीपक चव्हाण यांना त्यामुळे पराभवाचा झटका बसला आहे. सचिन पाटील यांना 1,19287,दीपक चव्हाण यांना 1,02247 मते मिळवत 17046 मतांनी दणदणीत विजय मिळवला.

  • ठळक...
  •  एक निर्धार बौद्ध आमदार ही घोषणादेत संविधान समर्थन समितीने शेतकरी संघटनेच्या तिकिटावर प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र बौद्ध समाजाच्या मतदारांनी याकडे पाठ फिरवल्याचे आकडेवाडीवरून स्पष्ट झाले.
  •  सचिन पाटील यांच्या विजयानंतर आमदार जयकुमार गोरे फलटणला विजयी मिरवणुकीत सामील झाले.
  •  राष्ट्रीय समाज पक्षाला या निवडणूकीतही आपली छाप पाडता आली नाही.
  •  निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मतमोजणी करीता उत्कृष्ट नियोजन केले होते. तर पत्रकारांसाठी विशेष शामियाना उभारण्यात आला होता. चहा नाष्टा व दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. 
  • उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त चोख बजावण्यात आला. 
  •  सचिन पाटील यांच्या विजयानंतर फलटण शहरातून फटाक्यांची आतिषबाजी व गुलाबांची उधळून करीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजय सभेचा विजय करण्यात आले होते. 
  •  सचिन पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच घेतलेले मताधिक्य अंतिम मोजणी पर्यंत कायमच राहिले.
  •  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे 1995, 2000 व 2004 साली सलग 3 वेळा फलटण मधून विधानसभेवर निवडून गेले होते.
  •  फलटण - कोरेगाव (अ. जा.) हा विधानसभा मतदार संघ निर्मिती नंतर 2009, 2014 व 2019 असे सलग तीन वेळा दिपक चव्हाण निवडून गेले होते.
  •  1995 ला रामराजे यांना आमदार करण्यात मा. खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा मोठा वाटा होता. तर रामराजे यांची सत्ता परिवर्तणात त्यांचे सुपुत्र मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे किंगमेकर ठरले. 
  •  मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लोकसभेला पराभव करण्यासाठी राजे कुटुंब आघाडीवर होते. मात्र रणजितसिंह यांनी पुन्हा डावपेव आखात मोठा विजय मिळवीला.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER