सातारा दि.22 : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त येथील स्व. यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ सायन्स, सातारा महाविद्यालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबीर प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.एस. अडकर यांच्या मार्गदर्शनाखली आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरामध्ये सहाय्यक विधी सहाय्य बचाव सल्लागार ॲङ आशिष राठोड यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवस या विषयी तसेच तरुणांनी सोशल मीडियाचा वाप गरजेपुरता करावा व त्यांना त्यांच्या भविष्यासाठी मार्गदर्शन केले.
सहायक विधी सहाय्य बचाव सल्लागार ॲङ अमृता ताटे यांनी अदिवासींच्या हक्कांचे संरक्षण आणि अंमलबजावणी योजना विषयी मार्गदर्शन केले. तसेच मुख्य विधी सहाय्यक विधी सहाय्य बचाव सल्लागार ॲङ आकाश महांगडे यांनी रॅगिंग विरोधी कायदे उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या शिबीरासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.